संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. नैतिकतेच्या आधारावर मुंडेंनी राजीनामा द्यावा, असं विरोधक म्हणत आहेत. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देत अजित पवार यांच्या भूमिकेशी आपण सहमत असल्याचं ते म्हणाले.