Sanjay Raut : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. शरद पवार यांच्या हस्तेत दिल्लीत हा पुरस्कार देण्यात आला.या पुरस्कार सोहळ्यावरून आता महाराष्ट्रात राजकीय धुसफूस सुरू झाली आहे. शिवसेना फोडणाऱ्या व्यक्तीला शरद पवारांनी पुरस्कार दिल्यावरून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला हे. ते आज माध्यमांशी बोलत होते.