Father In Law Kidnapped Son In Law due to Fight Over Intercaste Wedding: कोल्हापुरात सासर्याकडूनच जावयाचं अपहरण झाल्याची घटना घडली आहे. मुलीने केलेलं आंतरजातीय लग्न मान्य नसल्याने वडिलांनी हे पाऊल उचललंय. अपहरण करून जावयाला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची ही घटना रविवारी करवीर तालुक्यातील भुयेवाडी गावात घडलीय. या प्रकारानंतर कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखा आणि करवीर पोलिसांनी संयुक्त तपास करुन अपहरण झालेल्या विशाल मोहन अडसूळ या तरुणाला सुखरुप सोडवलं आहे. याप्रकरणी कोल्हापूर पोलीसांनी तिघांना अटक केली असून यातील चार संशयितांचा अजून शोध सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने यांनी दिलीय.