रणवीर अलाहाबादियाच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. संसदेतही त्याचे पडसाद उमटले. इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये त्याने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर भाडिपाच्या अतिशय निर्ल्लज कांदेपोहेचा एपिसोड पुढे ढकलण्यात आला आहे. या संदर्भातील पोस्ट आता भाडिपाने डिलीट केली आहे. मात्र या पोस्टमध्ये नेमकं काय होतं याविषयी सविस्तर जाणून घेऊ.