Vinayak Raut: माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना ठाकरे गटाला धक्का देत उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज (बुधवार) साळवी यांनी काही कार्यकर्त्यांबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजन साळवी यांनी विनायक राऊत यांच्यावर काही आरोप केले. त्यांच्या आरोपांना आता विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.