Eknath Shinde Targets Uddhav Thackeray as Rajan Salvi Joins Shinde Group: लांजा राजापूर मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी नुकतेच शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केला. तीन वेळा लांजा राजापूर मतदारसंघाचे आमदार राहिलेल्या राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान राजन साळवी यांच्या प्रक्ष प्रवेश सोहळ्यास विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव करणारे किरण सामंतही उपस्थित होते.