Eknath Shinde Targets Uddhav Thackeray: लांजा राजापूर मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी नुकतेच शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केला. पक्ष प्रवेशाच्या वेळी साळवींविषयी बोलताना या पक्षात जो काम करेल तो पुढे जाईल असं म्हणताना शिंदेंनी दोन ओळींची कविता म्हणून दाखवली आहे.