Dehu Firing On Road CCTV: पिंपरी- चिंचवड मधील देहूरोड मध्ये गोळीबाराच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोघे जण जखमी आहेत. ही घटना गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. या घटनेचा एक सीसीटीव्ही समोर आला असून सीसीटीव्ही मध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांवर सराईत गुन्हेगार अंदाधुंद फायरिंग करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. या घटनेमध्ये विक्रम गुरुस्वामी रेड्डी याचा मृत्यू झाला आहे.