Mumbai Local Delay At Diva Station: मध्य रेल्वेवरील उपनगरीय रेल्वे सेवा दररोज बहुविध कारणांनी उशिराने धावते. मध्य रेल्वे प्रशासन उदघोषणेद्वारे दिलगिरी व्यक्त करून विलंबाच्या खोल जखमेवर तात्पुरती मलमपट्टी केली जाते. समाज माध्यमांवर प्रवाशांच्या विलंबाच्या तक्रारीवर मध्य रेल्वेकडून समांतर रस्ता फाटकामुळे (लेव्हल क्राॅसिंग गेट) लोकल सेवा उशिराने धावत असल्याचे सांगण्यात येते. चालू आर्थिक वर्षात जानेवारी २०२५ पर्यंत मध्य रेल्वेवर रेल्वे फाटकामुळे सुमारे २,५०० वेळा वेळा लोकलचे वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे जादा वेळ खुले राहिलेल्या रेल्वे फाटकाचा त्रास प्रवाशांच्या पाचवीला पुजलेला आहे.