राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केल्याचे पाहायला मिळाले. “मी बाळासाहेबांबरोबर काम केले आहे. ते आपल्या सहकाऱ्यांना सवंगड्यांसारखे वागवायचे. पण नंतर त्यांच्या पश्चात सहकाऱ्यांना नोकर-घरगड्यासारखी वागणूक दिली गेली.”, असं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले. अशातच आता एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.