RBI Imposes Restrictions on New India Co-operative Bank Mumbai : भारतीय रिझर्व्ह बँकेने काल रात्री मुंबईस्थित न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर नवीन कर्ज वितरीत करण्यास आणि ठेवी काढण्यास सहा महिन्यांसाठी बंदी घातली आहे. बँकेत अलीकडील काळात घडलेल्या काही घडामोडींमुळे ठेवीदारांच्या रक्षण करण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. यानंतर शुक्रवारी सकाळी मुंबईतील अंधेरीत बँकेच्या शाखेबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी जमल्याचे पाहायला मिळत आहे. आरबीआयच्या निर्णयानंतर ग्राहकांनी त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले पैसे काढण्यासाठी ही गर्दी केली आहे.