PM Narendra Modi US Visit: डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भेटीसाठी अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. दरम्यान आज पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या बैठक झाली असून, यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा आणि करार झाले आहे. या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत दाखल झालेल्या खटल्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा झाली का? असे विचारण्यात आले होते. यावर मोदींनी नेमकं काय म्हटलं ते पाहूया..