मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहकुटुंब शुक्रवारी महाकुंभमेळ्यात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मणिकर्णिका ते नमो घाटपर्यंत बोटीने प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी आपल्या मुलीसह हनुमान चालिसेचं पठण केलं. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला असून अनेकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.