भाजपा आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्यावर आता टीकेची झोड उठवली जात आहे. खासदार संजय राऊत यांनी देखील त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. धस यांच्यावर विश्वास ठेवू नका हे बीडमधील एका नेत्यानं सांगितलं होतं. धस, मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहेत. ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे, असं राऊत म्हणाले.