कल्याण डोंबिवली महापालिकेची खोटी कागदपत्रं सादर करत महारेराचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या ६५ इमारती कारवाईच्या फेऱ्यात सापडल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर डोंबिवलीतील ६५ इमारती जमिनदोस्त होणार आहेत. या प्रकरणी रहिवाशांनी आता पुनर्वसन करण्याची मागणी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.