उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हा पुरस्कार देताना एकनाथ शिंदेंच कौतुक केलं होतं. त्यावरून ठाकरे गटाने पवारांवर नाराजी व्यक्त केली. याबाबत एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीतील जाहीर सभेत भाष्य केलं. ज्यांनी एकेकाळी तुम्हाला मुख्यमंत्री केलं त्यांचाही अपमान करत आहात. जनाची तर मनाची तरी ठेवा, अशी टीका शिंदेंनी केली.