शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार भास्कर जाधव हे नाराज असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. भास्कर जाधव हे शिंदे गटात जाणार असंही बोललं जात आहे. मात्र या सगळ्या चर्चांवर आता भास्कर जाधव यांनी स्वतः पडदा टाकला आहे. या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे.