फरार आरोपी कृष्ण आंधळेला तत्काळ अटक करून त्याला फाशी देण्यात यावी, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे. ज्यावेळेस या प्रकरणातील सर्व आरोपी फासावर लटकतील त्यावेळेस आमचं समाधान होईल. तपास योग्य दिशेने आणि निष्पक्षपातीपणे चालवा यासाठी आम्ही वेळोवेळी विनंती करत आहोत, असंही देशमुख म्हणाले.