आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून सध्या विरोधकांकडून टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. एक आमदार एखाद्या मंत्र्याला भेटला तर त्याने कुठलाही फरक पडत नाही. सुरेश धस यांची भूमिका ठाम आहे, असं फडणवीस म्हणाले.