Dombivili Illegal Buildings: डोंबिवलीतील महारेरातील ५१ बेकायदा इमारतींवर पालिकेचा हातोडा पडणार असल्याचे स्पष्ट झाले. डिसेंबरमध्ये १६ इमारतींमधील रहिवासी, विकासकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. आपले प्रस्ताव कल्याण डोंबिवली पालिकेत नियमितीकरणासाठी दाखल केले आहेत, अशी भूमिका घेतली. नियमितीकरणासाठीची आवश्यक कागदपत्रे रहिवाशांनी पालिकेत दाखल न केल्याने नगररचना विभागाने ३२ बेकायदा इमारतींचे प्रस्ताव फेटाळून लावले.