BMC Issues Notice to stop using Coal Tandoor: आतापर्यंत 84 ढाबे, हॉटेल, रेस्टॉरंट आणि तंदूर आस्थापनांना मुंबई महापालिकेकडून याबाबतची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे, हॉटेल व धाबा मालकांचे धाबे दणाणले आहेत. मुंबई उच्च न्यालयाच्या आदेशानुसार महापालिकेनं सूचना जारी करुन रेस्टॉरंटचालक व धाबा मालकांना ही नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे, मुंबईत रेस्टॉरंट, बेकरी आणि धाबाचालकांची संख्या 1 हजारांच्या पुढे असेल. त्यातील बहुतांश चालक हे विद्युत उपकरणाचा वापर करतात. मात्र, अनेकजण अद्यापही जुन्याच पद्धतीचा अवलंब करत असून धाब्यांवर सर्रासपणे कोळशा भट्टीचाच वापर केला जातो. त्यामुळे, महापालिकेनं याची दखल घेत सक्तीने संबंधितांना नोटीसा बजावल्या आहेत.