अहिल्यानगर येथे २ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. त्या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा अहिल्यानगर येथे १३ तारखेला पार पडला. पण कुस्ती संघटनेकडून त्या ठिकाणी माझा सन्मान केला नाही.तर मला उपमहाराष्ट्र केसरी विजेत्याचे बक्षीस देखील दिले नाही, असं उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाडने सांगितलं. दरम्यान, आयोजक विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी आपला सत्कार केला.मात्र कुस्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून बक्षिस दिलं जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. या कुस्तीमध्ये राजकारण आलं असून यातील सर्व वाद संपले पाहिजे, असंही महेंद्र गायकवाड म्हणाला.