Torres Scam Money To Be Returned: टोरेस गैरव्यवहारप्रकरणी आतापर्यंत ३५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून त्याशिवास टोरेस कंपनीशी संबंधित छोट्यामोठ्या वस्तू, सात-आठ मोटारगाड्या व महागडे खडे जप्त करण्याची परवानगी आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयाकडे मागितली आहे. याशिवाय याप्रकरणी सक्षम अधिकारी नियुक्ती करण्याबाबतही प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी सहा महिन्यांत सर्व प्रक्रिया संपवून तक्रारदारांना रक्कम परत करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.