Jalna: जालन्यात इनोव्हा गाडीतून गायीची चोरी केल्याची घटना समोर आलीय. जालना शहरातील नवीन मोंढा भागातील रॉयल नगर येथे ही घटना घडली असून हा संपूर्ण प्रकार मध्यरात्री च्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. इनोव्हा गाडीतून आलेल्या दोघांनी रॉयल नगर येथे आपली गाडी थांबवली.यावेळी त्यांनी एका गायीला गाडीच्या मागील डीक्कित कोंबले आणि ते तिथून फरार झाले. या संपूर्ण घटनेनं एकच खळबळ उडाली असून जनावर चोरांवर पोलिस काय कारवाई करतात हे पाहणे आता महत्त्वाचे असणार आहे.