मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. त्याचं कारण म्हणजे शिवसेनाभवन समोर लागलेलं बॅनर. या बॅनरवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा बाळासाहेबांबरोबरचा एकत्रित फोटो छापण्यात आला असून त्यावर आशयही लिहिला आहे. या बॅनरची सध्या चर्चा रंगली आहे.