Kalyan Dombivali Illegal Building Controversy: डोंबिवली पूर्व आयरे भागातील टावरीपाडा येथील समर्थ काॅम्पलेक्स ही सात माळ्याची बेकायदा इमारत तोडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. ६५ महारेरा प्रकरणातील ही इमारत आहे. आणि एका जमीन मालकाचा या बेकायदा इमारतीच्या जागेवरील हक्क डावलून या इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. या जमीन मालकाने याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका केली होती. या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाने समर्थ काॅम्पलेक्स ही बेकायदा इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले.