Fadnavis Reacts On SC Hearing Over Ranveer Allahabadia Controversy: गेल्या काही दिवसांपासून रणवीर अलाहाबादिया प्रकरणाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. रणवीर अलाहाबादियानं त्याच्या ‘इंडियाज गॉट लेटंट’ शोमध्ये केलेल्या अश्लील टिप्पणीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या विधानाबाबत रणवीरनं नंतर माफदेखील मागितली. मात्र, ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर अशा प्रकारचा मजकूर जाणं सामाजिक नैतिकतेला धरून नसल्याचं म्हणत रणवीरवर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. रणवीरविरोधात गुन्हे दाखल झाले असून अटकेपासून संरक्षण मिळावं, यासाठी रणवीर अलाहाबादियानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने अलाहाबादियाला चांगलंच सुनावलं आहे. तसेच, अशा प्रकारच्या मजकुराला आळा घालण्यासाठी निर्बंधांचेही सूतोवाच केले आहेत. याविषयी आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे हे पाहूया.