Dombivali Illegal Building Controversy: डोंबिवलीत मागील पाच ते सहा वर्षाच्या काळात ६५ महारेरा प्रकरणातील बेकायदा इमारती उभ्या राहिल्या. त्यावेळी कल्याण-डोंबिवली पालिकेतील ज्या उपायुक्त, साहाय्यक आयुक्त आणि नियंत्रक अधिकाऱ्यांनी या बेकायदा इमारतींवर कारवाई न करता त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. अशा सर्व पालिका अधिकाऱ्यांची चौकशी सुरू करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे डोंबिवली विभागाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्याकडे मंगळवारी केली आहे.