Yogi Adityanath Slams Jaya Bachchan: यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जया बच्चन आणि इतर विरोधी नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा दाखल देत महाकुंभमेळ्यावर केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे. संगमच्या पाण्यातील विष्ठेतील जीवाणूंबद्दलच्या प्रश्नांना उत्तर देताना, मुख्यमंत्री योगी म्हणाले की पाणी शुद्धीकरणाचे उपाय चालू आहेत तसेच त्यांनी या आरोपांना महाकुंभ बदनाम करण्याची खोटी मोहीम असल्याचे म्हटले आहे.