Pimpari 20 Year Old Girl Suicide: पिंपरीला राहणाऱ्या एका तरुणीच्या मोबाईलवर अचानक एक ४२ मिनिटांची व्हॉइस नोट आली, ती सुरु करताच त्यात तिला असं कळलं की तिच्या एका जवळच्या मैत्रिणीने आत्महत्या केलीये. आश्चर्य म्हणजे, ही व्हॉइस नोट सुद्धा त्याच जीव गमावलेल्या मैत्रिणीने तिला पाठवली होती. त्या व्हॉइस नोटमध्ये केलेले धक्कादायक खुलाश्यांवरून आणि २० वर्षीय तरुणीच्या मृत्यूचं कोड उलगडायला मदत झालीये. प्रेमसबंधातून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या तरुणीने १५ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.