Dombivali Illegal Building Controversy: ६५ बेकायदा इमारती प्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी अतिशय धक्कादायक खुलासा केला आहे. महारेरा घोटाळा उघड झाल्यानंतर कोट्यावधीच्या या घोटाळ्याबाबत मी ईडी आणि एसआयटीकडे काही कागदपत्रे सादर करीत तक्रार केली. मात्र, माझ्या तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही. जवळपास अडीच हजार कोटीचा घोटाळा महापालिकेचे अधिकारी सामील असल्याशिवाय होऊच शकत नाही असा गंभीर आरोप देखील घाणेकर यांनी केला आहे.