Karuna Munde on Alimony Case: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात कौटुंबिक न्यायालयात गेलेल्या करुणा मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कौटुंबिक न्यायालयाने अंतरिम निकाल देत असताना तक्रारदार करुणा मुंडे यांना दरमहा १ लाख २५ हजार तर त्यांच्या मुलीला ७५ हजार रुपये असे एकूण दोन लाख रुपये देखभाल खर्च देण्याचा निकाल दिला आहे. दरम्यान हा देखभाल खर्च कमी असून मासिक १५ लाख रुपये देखभाल खर्च म्हणून द्यावा, अशी मागणी करत आता उच्च न्यायालयात जाणार असल्याचे करुणा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यानंतर आता काल १९ फेब्रुवारी २०२४ ला मुंडेंच्या पूर्व पत्नीने सुप्रिया सुळे यांची भेट घेत आपल्याबाबत घडलेल्या गोष्टींची माहिती देत एक निवदेन केलं आहे. करुणा मुंडे यांनी स्वतः याबाबत काय माहिती दिली पाहूया.