Vicky Kaushal Speech In Front of Devendra Fadnavis: छावा या चित्रपटात संभाजी महाराजांची भूमिका करण्याची संधी मिळाली ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे असं अभिनेता विकी कौशल म्हणाला. याच आग्र्याच्या किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची पाऊले पडली ही गोष्ट आपल्यासाठी अभिमानास्पद आहे असंही तो म्हणाला. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आग्र्याच्या किल्ल्यामध्ये साजरी करण्यात आली. त्यानिमित्त कार्यक्रमात विकी कौशल बोलत होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.