Maharashtra SSC Board Exams 2024-25: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमांतून राज्यभरात उद्या २१ फेब्रुवारी २०२५ पासून दहावीची परिक्षा सुरू होत आहे.तर परीक्षेला १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी बसले आहेत. तर यामध्ये ८ लाख ६४ हजार १२० मुले, ७ लाख ४७ हजार ४७१ मुली, तर १९ ट्रान्सजेंडर परीक्षा देणार आहेत. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.तर 23 हजार 492 माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्याची नोंदणी केली आहे.तर 5 हजार 130 मुख्य केंद्रावर परीक्षा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.