Worli Citizens Protest For Houses, MNS Leader Sandeep Deshpande : वरळीतील सिद्धार्थ नगर मधील रहिवाश्यांचे हक्काच्या घरासाठी जन आंदोलन सुरु आहे. गेली २७ वर्षे SRA प्रकल्प रखडला असल्याने नागरिकांना स्वत:च्या हक्काची घरे मिळू शकली नाहीत, हक्काच्या घरासाठी मनसेच्या नेतृत्वाखाली लढा होत आहे. संबंधित विकासक येऊन हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलक केला आहे. या आंदोलनात महिला पुरुष मोठ्या संख्येत सामील झाले आहेत.