जरांगे पाटील यांना बाजूला करण्यासाठी सुरेश धस यांना उभं करण्यात आलं. आता भाजपाने सुरेश धस यांचाच पत्ता कापला, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडर यांनी दिली आहे. धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यामुळे मनोज जरांगे हे सुरेश धस यांच्यावर टीका करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी हे विधान केलं.