महायुतीला मिळालेला हा अभूतपूर्व विजय लाडकी बहीण योजनेमुळे नसून साधू-संत, संघामुळे मिळाला असल्याचं विधान नरेंद्र महाराज यांनी केलं आहे. रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राजकीय नेतेमंडळींवर टीका केली. आम्ही ठरवलं, तर राजकारण्यांना खुर्चीवरून खाली खेचू शकतो, असंही नरेंद्र महाराज यावेळी म्हणाले.