जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात दहावीचा मराठी विषयाचा पेपर फुटला अशी बातमी समोर आले होती. मात्र प्रत्यक्षात असा कोणताही प्रकार घडलेला नसून स्थानिक झेरॉक्स दूकानदारांनी आजच्या मराठी विषयाच्या प्रश्न पत्रिकेत न आलेल्या प्रश्नांची झेरॉक्स काढून विक्री केली आहे. प्रश्नपत्रिका परिक्षा केंद्राच्या बाहेर आलेली नाही, असं स्पष्टीकरण जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिलं आहे.