एकनाथ शिंदे आणि मी एकाच व्यासपीठावर असलो की क्लोज कॅमेरे आमच्यावर असतात. आमच्या देहबोलीचा अभ्यास केला जातो. त्यामुळे आमच्या चेहऱ्यावर हास्य आहे का नाही ते देखील पाहिलं जातं. त्यामुळे मी माझ्या मनाला नेहमी सांगतो की चेहरा प्रसन्न दिसला पाहिजे, नाहीतर उगाच बातमी व्हायची, असं विधान अजित पवार यांनी करताच एकच हशा पिकला. ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.