दिल्लीत रविवारी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप झाला. या समारोपाच्या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमानिमित्त एकनाथ शिंदे आणि अजित पवार एका व्यासपीठावर आले होते. या कार्यक्रमाच्या भाषणात अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली. अजित पवारांनी त्यांच्या भाषणात काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ‘मला हलक्यात घेऊ नका’ या वक्तव्याचा उल्लेख करत थेट सवाल विचारला, तर अजित पवारांच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनीही उत्तर दिलं.