नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेबाबत केलेल्या विधानावरून सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. यावरून आता खासदार संजय राऊत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडेही बोट दाखवलं आहे. साहित्य संमेलनात झालेल्या या राजकीय चिखलफेकीसाठी शरद पवारही जबाबदार असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.