नीलम गोऱ्हें यांनी २०१७ ते २२ पर्यंत माझा पक्षप्रवेश होऊ दिला नाही, असं विधान ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलं
आहे. अक्षरशः त्यांच्यापासून आपल्या पक्षप्रवेशाची बातमी लपवून सचिन अहिर यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला, असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं. पुण्यात त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या.