Dombivali Illegal Building Case: ठाणे येथील खारकर आळी भागातील रघुवंशी हॉल मध्ये सोमवारी वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतला. इथे भेट दिल्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते दिपेश म्हात्रे यांनी घडलेल्या चर्चेविषयी माहिती दिली. कल्याण मधील 65 इमारतीच्या बाबतीत आम्ही जनता दरबारात न्याय मागितला आहे, आम्हाला नाईक यांनी आश्वस्त केले आहे की, येथी रहिवासी यांच्यावर कोणत्याही स्वरूपात अन्याय होऊ देणार नाही, शासनाने आता न्यायालयात रहिवाशांसाठी रिट याचिका दाखल करावी आणि येथील जनतेला न्याय द्यावा. अशी मागणी केली आहे.