Diva Illegal Building Case: कल्याण – डोंबिवली शहरातील बेकायदा इमारतीमधील रहिवाशांची फसवणूक झाली असून न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान ठेवून येथील नागरिकांना न्याय कसा देता येईल याचा विचार केला जाईल, असे मत वनमंत्री गणेश नाईक यांनी सोमवारी जनता दरबारात व्यक्त केले. तसेच दिव्यातील ५४ इमारतींबाबत मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येईल, तोपर्यंत ही कारवाई तूर्तास थांबवा , असे आदेश त्यांनी यावेळी दिले आहे.