बनावट कागदपत्रे सादर करून शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना ठोठावलेल्या शिक्षेच्या अंमलबजावणीस नाशिक सत्र न्यायालयाने अपिल प्रलंबित असेपर्यंत तात्पुरती स्थगिती दिली आहे. दरम्यान या प्रकरणामुळे कोकाटे यांच्या आमदारकी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. याबद्दल माणिकराव कोकाटे यांचे वकील अॅड. अविनाश भिडे यांनी अधिकची माहिती दिली आहे. दरम्यान, शिक्षेला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेल्या दुसऱ्या अर्जावर आज (मंगळवारी) युक्तिवाद होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे.