नाना पटोले यांना धक्का देत काँग्रेसने हर्षवर्धन सपकाळ यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांची नावं चर्चेत होती. असं असतानाच माजी आमदार राहिलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांना ही संधी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या. या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यामागे नेमकं कारण काय? त्यांच्यापुढील आव्हान कोणती? याविषयी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी ‘दृष्टिकोन’ मधून केलेलं हे विश्लेषण…