बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तिचे सहकलाकार येथे शिवार्पणनस्तु नृत्य सादर करणार आहेत. मात्र, या कार्यक्रमाला आता माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी विरोध दर्शवला आहे.