Javed Akhtar, Virat Kohli, & Aaditya Thackeray: विराट कोहली जिंदाबाद, हमे आप पर गर्व है या भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यानंतर सात शब्दांच्या अख्तर यांच्या पोस्टवरून मात्र आता वेगळाच वाद सुरु झाला आहे.भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामन्यात यजमानांना हरवून भारताने आपलं वर्चस्व सिद्ध केलं. विजयासाठी अवघ्या २४२ धावांचं पाकिस्तानने दिलेलं लक्ष्य एकट्या विराटच्या शतकासह जे भारतीय संघाने सहा गडी राखत गाठलं. अर्थात विराटच्या कामगिरीसाठी त्याचं सगळेच कौतुक करत होते, असंच कौतुक जावेद अख्तर यांनीही केलं. मात्र त्यावर एका युजरने त्यांना टोमणा मारला, या टोमण्यानंतर जावेद अख्तर यांनी असं काही तिखट प्रत्युत्तर दिलं की त्यांच्या पोस्टची सर्वत्र चर्चा होऊ लागली. इतकंच नाही तर आता अख्तर यांची बाजू घेत स्वतः आदित्य ठाकरेंनी सुद्धा या वादात उडी घेतली आहे. नेमकं हे प्रकरण काय, चला पाहूया..