School Reopening After Summer Holidays: आता राज्य शिक्षण महामंडळाच्या शाळांमध्ये सुद्धा CBSE सारखा अभ्यासक्रम राबवून नव्या पाठयपुस्तकांपासून ते शाळेच्या वेळापत्रकांपर्यंत विविध बदल येत्या काळात होणार असल्याची चर्चा आहे. यातील पुस्तकांचा बदल हा भाग योग्य असला तरी शाळेच्या वेळापत्रकांवरून काही दिवस संभ्रम निर्माण झाला होता. झालं असं की. शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे शिक्षण राज्यमंत्र्यांनी दोनच दिवसांपूर्वी सांगितलेले होतं. मात्र याबाबत शासन निर्णय जाहीर न झाल्याने व पुरेसं स्पष्टीकरण न मिळाल्याने पालक, विद्यार्थी सगळेच संभ्रमित होते. अशातच आता हा प्रश्न दूर करत शिक्षण आयुक्तांनी सगळी माहिती स्पष्ट केली आहे.