Kolhapur Indrajit Sawant: कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. छावा चित्रपटावर भूमिका मांडताना ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करणारा फोन नागपुरातील डॉ. प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीने केला आहे. इंद्रजीत सावंतांनी सोशल मीडियावर कॉल रेकॉर्डिंग टाकून याची माहिती दिली होती. फोन करणाऱ्या व्यक्तीने सावंत यांना धमकी देताना मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव घेत वक्तव्यं केली आहेत. जिथं असाल तिथं येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा, असं म्हणत इंद्रजीत सावंतांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आला आहे.